रविवार, २९ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -५

 


 शाळेच्या गॅदरिंगसाठी कुठला डान्स बसवायचा यासाठी सगळे आज स्वातीच्या गच्चीवर जमणार होते. महिनाअखेर असल्यानं शाळा लवकर सुटली होती.  वर्गशिक्षिका असलेल्या भांगे बाईंनी वर्ग मॉनिटर असलेल्या स्वाती आणि नृत्यात ब-या असलेल्या राधिका आणि सावनी यांच्यावर डान्सची सगळी जबाबदारी टाकली. "तुम्ही दोघींनी डान्ससाठी एखादं छानसं गाणं निवडा. कडव्यापर्यंत तरी डान्सच्या स्टेप्स आज बसल्याच पाहिजेत" असं दटावून बाईंनी वर्ग सोडला. स्वातीने टेपरेकॉर्डर आणायची जबाबदारी घेतली. त्यामुळे जमेल तेवढ्या गाण्याच्या कॅसेट्स गोळा करून सगळ्यांनी दुपारपर्यंत स्वातीच्या गच्चीवर जमायचं असं ठरल. हे सगळं होत असताना मनवा कुठेच दिसत नव्हती. " कुठे गेली असेल ही, जाताना मला काही सांगूनसुध्दा गेली नाही". स्वातीचा स्वत:शीच संवाद सुरू होता. सगळ्या मैत्रिणींकडे  मनवाची विचारपूस करत कंटाळलेल्या स्वातीने बराच वेळ मनवाची वाट बघितली. शेवटी स्वातीनं घरचा रस्ता धरला. 

 भर दुपारी स्वातीच्या गच्चीवर एकच कल्ला सुरू होता. एकेक करत डान्समध्ये भाग घेतलेल्या सगळ्या मुलं - मुली गच्चीवर एकत्र जमल्या होत्या. सगळे गप्पा मारण्यात दंग झाले हेते. स्वातीच्या आईनं २ चटया आणून सगळ्यांना त्यावर बसायला सांगितलं. तसचं सगळ्यांना खायला फरसाण आणि पाणीही आणून ठेवल होतं. 

 जाता जाता त्या स्वत:शीच पुटपटत होत्या, " दुपारी झोपेच्या वेळेला ही पोरं किती गोंधळ घालतायत देव जाणे. बिल्डींगमधल्या कोणी तक्रार केली नाही म्हणजे मिळवल. तसंही आज माझ्या सुध्दा झोपेचं खोबरच होणार आहे". स्वत:शी मनातल्या मनात बोलत असताना त्यांना मनवाने त्यांना खालूनच 'काकू' म्हणून हाक मारली पण त्यांचं लक्षच नव्हत. स्वाती वर आहे का असं तिला विचारायचं होतं.    

क्रमश: 


२ टिप्पण्या: