रविवार, २९ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -५

 


 शाळेच्या गॅदरिंगसाठी कुठला डान्स बसवायचा यासाठी सगळे आज स्वातीच्या गच्चीवर जमणार होते. महिनाअखेर असल्यानं शाळा लवकर सुटली होती.  वर्गशिक्षिका असलेल्या भांगे बाईंनी वर्ग मॉनिटर असलेल्या स्वाती आणि नृत्यात ब-या असलेल्या राधिका आणि सावनी यांच्यावर डान्सची सगळी जबाबदारी टाकली. "तुम्ही दोघींनी डान्ससाठी एखादं छानसं गाणं निवडा. कडव्यापर्यंत तरी डान्सच्या स्टेप्स आज बसल्याच पाहिजेत" असं दटावून बाईंनी वर्ग सोडला. स्वातीने टेपरेकॉर्डर आणायची जबाबदारी घेतली. त्यामुळे जमेल तेवढ्या गाण्याच्या कॅसेट्स गोळा करून सगळ्यांनी दुपारपर्यंत स्वातीच्या गच्चीवर जमायचं असं ठरल. हे सगळं होत असताना मनवा कुठेच दिसत नव्हती. " कुठे गेली असेल ही, जाताना मला काही सांगूनसुध्दा गेली नाही". स्वातीचा स्वत:शीच संवाद सुरू होता. सगळ्या मैत्रिणींकडे  मनवाची विचारपूस करत कंटाळलेल्या स्वातीने बराच वेळ मनवाची वाट बघितली. शेवटी स्वातीनं घरचा रस्ता धरला. 

 भर दुपारी स्वातीच्या गच्चीवर एकच कल्ला सुरू होता. एकेक करत डान्समध्ये भाग घेतलेल्या सगळ्या मुलं - मुली गच्चीवर एकत्र जमल्या होत्या. सगळे गप्पा मारण्यात दंग झाले हेते. स्वातीच्या आईनं २ चटया आणून सगळ्यांना त्यावर बसायला सांगितलं. तसचं सगळ्यांना खायला फरसाण आणि पाणीही आणून ठेवल होतं. 

 जाता जाता त्या स्वत:शीच पुटपटत होत्या, " दुपारी झोपेच्या वेळेला ही पोरं किती गोंधळ घालतायत देव जाणे. बिल्डींगमधल्या कोणी तक्रार केली नाही म्हणजे मिळवल. तसंही आज माझ्या सुध्दा झोपेचं खोबरच होणार आहे". स्वत:शी मनातल्या मनात बोलत असताना त्यांना मनवाने त्यांना खालूनच 'काकू' म्हणून हाक मारली पण त्यांचं लक्षच नव्हत. स्वाती वर आहे का असं तिला विचारायचं होतं.    

क्रमश: 


गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -४


"हुश्श नशीब छोटी काही बोलायच्या आत मी तिचं तोंड बंदं केलं"  स्वत:शीच पुटपूटत मनवानं सुटकेचा नि:श्वास सोडला. अस्मिता आणि मनवा दोघीही आपआपल्या कामाला लागल्या. मनवाची आई स्वयंपाकघरात होती. रात्रीचे ८ वाजले होते. त्यांचे बाबा अद्याप कामावरून घरी आले नव्हते. मनवाचे बाबा आल्यावर गप्पा मारत सगळ्यांची जेवणं आटपली. झोपायला आज तसा फार उशीरच झालेला, पण मनवाला कसली झोप लागतेय! सगळ्यांची निजानीज झाली पण मनूच्या मनात एकच विचार पिंगा घालत होते. विचारांच्या गर्तेत कधी झोप लागली तिला कळलेदेखील नाही.



 समोरचे दृश्य फारच विलोभनीय होते. एखाद्या सुंदर चित्रासारखे. निळेशुभ्र पांघरलेले आकाश, सूर्याची कोवळी किरणे आपला सोनेरी प्रकाश पसरवत होती. हिरव्याकंच झाडांवर बसलेले पक्षी किलबिलत होते. एका लाकडी बाकावर एखाद्या परीसारखा पांढराशुभ्र फ्रॉक घालून मनू बसलेली आणि समोरून 'तो' तिच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत पुढे झेपावत होता. त्या 'त्या'च्या प्रत्येक पावलागणीक तिच्या ह्रदयाची धडधड वाढत होती. ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पहात होतो तो क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत यावर मनूचा विश्वासच बसेना. त्यामुळे मनूने डोळे घट्ट मिटून घेतलेले. जणूकाही डोळे बंद करून ती तो क्षण कायमचा तसाच गोठवून ठेवणार होती. 'तो' जवळ येऊन तिच्या शेजारी  लाकडी बाकावर बसणार इतक्यातच 'टिक् टिक् टिक् टिक.....' आवाजानं तिला जाग आली. घड्याळाचा गजर झालेला. 

 समोर पाहते तर काय ! त्यांच्या घराच्या दिवाणखान्यात ती होती. काही अंतरावर अस्मिता घोरत पडलेली. समोर तो लाकडी बाक, हिरवीगार झाडं, त्यावर बसलेले पक्षी, त्यांचा किलबिलाट, तिने घातलेला पांढराशुभ्र झगा आणि 'तो' कुठेच दिसत नव्हता. म्हणजे आपल्याला स्वप्न पडलेलं होतं. एक हाथ कपाळावर आपटत ती स्वत:ची फजिती झाल्यानं खट्टू झाली. एकाएकी तिला फार उदास वाटू लागलं. "शी बाई हे स्वप्न होतं तर. पण जर स्वप्न सत्यात उतरलं तर ? कित्ती मज्जा येईल नं" असं स्वत:शीच पुटपूटत स्वप्नरंजनात गढून गेली. स्वप्नात रममाण झालेल्या मनूला छान गाढ झोप लागली.

क्रमश: 


मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग - ३

 

 तिथे मनवाची पावलं बिल्डींगच्या पाय-या उतरू लागली. डोक्यात 'त्या'चेच विचार घोळत राहिल्याने तिची पावले हळू पडत होती. बिल्डींग कधीच मागे सरली होती आणि आता मनवा ती एका निमुळत्या रस्त्यावर आली. हिवाळा असल्याने दिवस लहान तर रात्र मोठी होती. त्यामुळे संध्याकाळी ६ च्या सुमारासच अंधारून यायचे. रस्त्यावर फारसे कुणी नव्हते. रस्त्याच्या कडेला असलेले पथदिवे आपला अंधुकसा प्रकाश देण्याचं काम करत होते. हवेत आता चांगलाच गारवा जाणवू लागलेला. आरएस १२ च्या खाली हमखास दिसणा-या इस्त्रीवाल्याचे छोटेखानी दुकान सुध्दा आज बंद होते. चालता चालता तिचे घर कधी आले हे तिला कळले सुध्दा नाही. 


 नेहमीप्रमाणे ती हाथ-पाय धुऊन देवापुढे हाथ जोडून शुभंकरोती म्हणू लागली. तिच्या आईचं तिच्यावर बारीक लक्ष होतच. प्रार्थना संपली तसं आईनं तिला विचारलचं, "आज इतका उशीर का झाला गं? इतक्या काय गप्पा मारत बसता गं तुम्ही की दिवे लागणीपर्यंत घर दिसत नाही तुम्हांला?"  आईचं ऐकूण घेणं हा मनवाचा स्वभाव नव्हता. उलट उत्तर देत मनवा म्हणाली, "थोडासाच तर उशीर झालाय ना. अशी बोलतेस की जसं मी रात्रीचे १२ वाजताच घरी उगवलेय" !  

 दोघींची खडाजंगी होत असलेली पाहून मनवाची धाकटी बहीण अस्मिता आली अन् आयत्या आलेल्या संधीचा फायदा घेत म्हणाली, "अगं आई स्वाती आणि तायडी की नई ...." ती पुढे काही बोलण्याच्या आत मनवाने तिच्या तोंडावर आपले दोन्ही हात घट्ट दाबून ठेवले. अस्मिताकडे रागाने डोळे मोठे करत तिला दटावत मनवाने तिच्या पाठीत एक धपाटा लावून दिला. "आईने मध्यस्थी केल्यानं तायडे तू आज वाचलीस, पण माझी पण वेळ येईलच जेव्हा मी तुला चांगलाच धडा शिकवेन" असं स्वत:शीच म्हणत अस्मिता आपली पाठ चोळत तिथून निघून जाते.


क्रमश: 

Copywrite : Vasudha Dhumak



रविवार, २२ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -२


 स्वाती आणि मनवा दोघीही ९ वी मध्ये होत्या. अडनिड्या वयात असं तासनंतासं ठराविक वेळी दररोज एकत्र येऊन गच्चीवर वेळ घालवणं, सतत कुजबुज करणं, वाढलेला नट्टापट्टा या बाबी स्वातीच्या आईच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. वयात येऊ घातलेल्या मुलीची आई म्हणजे किती दडपण नाही का?. "आता फार झालं. आज स्वातीच्या बाबांच्या कानावर हे घालायलाच हवं" असा दृढ निश्चय करून स्वातीच्या आईने आपला मोर्चा गच्चीकडे वळवलाच.



 गच्चीवर कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच दचकून सावध झालेल्या स्वाती आणि मनवाने मूळ गप्पांच्या विषयाला बगल देत मुद्दाम गॅदरिंगचा विषय काढला. आईला कसं फसवलं या थाटात त्या दोघीही साळसूदपणाचं नाटक करू लागल्या. पण त्यांच्या चेह-यावरचे भाव काही वेगळंच सांगत होते. आईला वर आलेली पाहून स्वाती उठून उभी राहत म्हणाली, "अगं आई आम्ही खाली येतच होतो गं'. "आता काय ? उठावच लागणार" असं स्वत:शीच पुटपूटत मनवाने बसलेल्या कठड्यावरून उडी मारली. स्वाती पण स्वत:च्या घरात आली. स्वातीच्या आईचा चेहरा बघून तिने निमूटपणे अभ्यासाच्या पुस्तकात तोंड खुपसले. "आता काय, रात्री बाबा घरी आल्यावर आई बाबांचे कान भरणार. मग काय स्वाती, आता बाबांचा ओरडा खायला तयार रहा"! असं ती स्वत:शीच म्हणत आपल्या मनाची तयारी करू लागली.

क्रमश:

Copywrite : Vasudha Dhumak

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -१

गुलाबी गच्ची 😆😝💕💞
भाग -१


 "अगं फार उशीर झालाय, बघ नं अजून कसा आला नाही 'हा?' मनवाने हिरमुसून स्वातीला प्रश्न विचारला. मावळतीचा सूर्य एव्हाना लुप्त होऊ लागला होता. तशी मनवाची चलबिचल आणखीनच वाढत होती. 'त्या'चे दर्शन न झाल्याने तिचा पुरता हिरमोड झाल्याचं तिच्या चेह-यावरून साफ दिसत होतं. आधीच चेहरा गोलमटोल, त्यात गोबरे गोबरे गाल. गालांचा फुगवटा आज जरा जास्तच जाणवत होता. कुठे चिमणीपाखरांचा थवा शिस्तबध्दरित्या आपआपल्या घरट्यात परतत होता. कॉलनीच्या मैदानावर क्रिकेट खेळणा-या मुलांचा खेळ पण एव्हाना संपण्यातच जमा होता. प्रत्येकाच्या आया आपआपल्या मुलांना हाका मारून घरी बोलावत होत्या. कॉलनीतल्या अंतर्गत रस्त्यांवर तुरळक माणसं होती. बहुतेक चाकरमानी कामावरून दमून-थकून घरी परतत असावेत. सूर्याच्या लालीने सबंध अवकाश व्यापून गेले होते. जणू काही मनवाचं असं हिरमुसण बघून अवकाश सुध्दा रागावून लालबुंद झाले असावे.

दररोज कॉलनीतील स्वाती रहात असलेल्या आरएस ७  बिल्डींगच्या गच्चीवर येऊन समोरच्या आरएस १० कडे एकटक बघत बसणे हा आता मनवाचा नित्यक्रमच होऊन बसलेला. मनवाबरोबर स्वाती पण गच्चीवर येऊन बसायची. या दोघींची जोडी तशी शाळेपासूनच होती. बालवर्गापासून दोघीही एकत्रच असायच्या, ते अगदी कॉलेजपर्यंत. शाळेतपण एकाच बाकावर, त्यामुळे एकमेकींची आवडनिवड, छंद, दोघींच्या घरचे सगळे एकमेकांना चांगलंच ओळखत होते.

संध्याकाळचे ७ वाजून गेले तरी स्वाती खाली आली नाही हे तिच्या आईच्या लक्षात आले. ७ वाजले की हात-पाय स्वच्छ धुऊन तुळशीसमोर हात जोडून 'शुभंकरोती' म्हणायचे हा तिच्या आईचा दंडक होता. ती दुस-या मजल्यावरील त्यांच्या घरासमोरील मोकळ्या पॅसेजमधून मान तिरपी करून गच्चीच्या दिशेने स्वातीला हाका मारू लागली. गप्पांमध्ये रमलेल्या दोघींची तंद्री स्वातीच्या आईच्या ओरडण्याने भंग पावली. स्वत:च्याच विश्वात रममाण झालेल्या मनवाचं मन आता फारच खट्टू झालं होतं. महत्प्रयासानं भानावर आलेल्या मनवाला आता स्वातीची आई व्हिलन वाटू लागली. मनवाने स्वातीकडे एक नजर टाकली आणि नकारार्थी मान हलवत तिला "चल ,खाली जाऊया" म्हणाली. मनवाच्या मते आजचा दिवस फुकट गेला होता. मुलींची लक्षणं काही ठीक नाहीत हे स्वातीच्या आईने चांगलेच हेरले होते. 

क्रमश: 
Copywrite : Vasudha Dhumak
Date : 22/1/2021

The crush

 The Crush 



It's been four years now that they know each other but still unknown. Despite of being in the same tutorials for two years they didn't exchanged a single word, but it seems an unknown bond has been woven around them. She's was crazy to hear his sound,  but her studios crush is much engrossed in solving the sums of maths and formulas.

A school time crush has become serious when she saw him entering her college and she was jubilant with an excitement. She never though she would see him again in her lifetime.

She could see her crush in one of the lecture when the both class would get assembled for SP lecture. She started keeping her eye at the door to seek the single glance of him. And the much awaited moment gets fulfilled as he steps in the SP class along with his close buddy Mahesh. She longed for SP lecture....and prays it would happen daily !.... Then she would lie down on the bench with one of her eye staring at him and another to see whether no one is watching her doing it..She doesn't seem interested in the lecture apart from, he being attending the lecture. His presence, his maneuver, half smile face had made her crazy about him. 

The days passed and on one fine day she saw him along with his friend Mahesh being approaching the bus stop. Her heart started pouncing fast, faster than the express train... today a much faster than the speed of an air.  As she was alone as usual, Mahesh started nudging him. It's time that their junior college would get over....She saw their common bus arriving on the bus stop and it's very crowded and thought of leaving it.  But,  it's him who wanted to catch the bus after seeing them she queued  up to a board. It was then her hand touched his hand for the first time and she couldn't surpass her joy.  Although it was crowded she manged to get glimpse of him. By the time Mahesh also started teasing him. Though she understood it she kept mute.

Days have past quickly and this exercise of waiting for SP lecture and waiting to get a single glimpse of him stayed for two years.  But since both of them were coy....they couldn't express their feelings  to each others.. 

Soon the last day of college came and again she lost him for the second time.

But the eager to meet him couldn't resist her from searching him. At last after few years she found him again on a platform called as virtual world and met him after a decade. They met and expressed the feelings to each others. She learned there was someone special in his life and she decided to support them. They remain in touch like a friend but could not able to meet again. One day he said he's getting engaged and soon to be married with someone else. That day onwards she decided to cut all communication with him for sake of his new beginning.  

हरवत चाललेली मी !

 


हरवत चाललेली मी ! 

मी स्वत:ला हरवत चालली आहे का ? हा प्रश्न आजकाल सतत डोकावत असतो.‌ कदाचित माझ्या अतिविचार करण्याच्या वृत्तीमुळे यांची प्रकर्षता अधिक जाणवत असावी.‌ मी सध्या काय करते हा प्रश्न जरी स्वतःला विचारला तरी स्वतःसाठी काय ? हा प्रतिप्रश्न उद्भवतोच. आणि त्याचे उत्तर 'काहीच नाही' असते.‌

सकाळी उठल्यापासून अंथरूणं आवरणे, झाडू इ.कामांचा उरक, माझा २ वर्ष २ महिन्यांचा मुलगा श्रीनिश, त्याचे दात घासणे, त्याला सकाळी गरम पाणी पाजणे, त्याची अंघोळ, नास्त्याची तयारी(भाज्या धुऊन, चिरणे किंवा त्यासाठी आईला कामाला लावायचं म्हणजे आपली ५ मिनीटं तरी वाचतात). लसूण सोलणे ही छोटी-छोटी पण वेळकाढू कामे आई-बाबांकडून करवून घेता येतात.

 एकीकडे फ्रीजमध्ये कुठली भाजी आहे हे तपासणे. दूध, नास्ता, भाज्या कुठल्या आणायच्या हे ठरवणे आणि तसे आणायला सांगणे.‌ आणलेले दूध गरम करणे, कुकरसाठी डाळ-तांदुळ धुणे या सगळ्यांमध्ये सकाळचे १०.३० कधी वाजतात कळत नाही.‌ बरं हे सोपस्कार पार पाडत असताना आमचं लेकरू किमान ५-६ वेळा तरी किचनमध्ये येऊन 'आई-आई मला हे हवं, , 'मला बिच्किट पायजे' असे हट्ट करत असतं. किचनमध्ये येऊन मला मिठी मारणं, भांडी ठेवलेले ड्राॅवर ओढून पळ्या काढणे, त्याचा बॅट म्हणून वापर करत चौकार-षटकार मारण्याचा पराक्रम सुरू असतो. त्याची मनधरणी करत खाऊ घालणं म्हणजे कसरतच म्हणायची. हे लिहीतानासुध्दा मला कौतुकसदृश्य हसू येतंय. याला काय म्हणावं ? एका आईचं आपल्या मुलावर असलेलं निखळ प्रेम !

बरं इतकी सगळी व्यवधानं सांभाळत असताना एखाद्या पदार्थात किती जिन्नस घालायचे, त्यांचं प्रमाण किती असावं याचा अचूक अंदाज कधीही चुकत नाही. हे सगळं घडत असताना श्रीनिशच्या शी -शू चा कार्यक्रम सुरूच असतो.‌ इथे किचनमधल्या कामातून टाईम प्लीज घेऊन त्याच्याकडे धाव घ्यावी लागते. सगळ्यांच्या नास्त्याच्या प्लेटस देऊन मग स्वतः नास्ता घ्यायचा. मुलाची अंघोळ, पीठ मळणे, स्वतःची अंघोळीमध्ये सकाळचे ११.३० होतात. मग मेडिटेशनसाठी पण बसता येत नाही.‌ श्रीनिशची काळजी, त्याला हवं-नको ते बघणं, त्यावर संस्कार करणं, चांगल्या गोष्टी शिकवणं यामध्येच समस्त 'आयां' चा वेळ मोडतो. ही वेळ खरंतर 'ति'च्या कसोटीची असते.‌ कारण एकीकडे मुलांचे संगोपन इ., सासू-सासरे सोबत असले की, त्यांची सरबराई करणे, नवरोबाच्या इच्छा पूर्ण करणे यामध्येच बाईचा बराचसा वेळ जातो. या धबडग्यात 'ती' बिचारी स्वतःसाठी वेळ कसा काढणार ? कामांचा रहाटगाडा संपला की ती थोडी विश्रांती घेईल, टीव्ही बघेल. पण मग तिच्या शिक्षणाचं काय? स्वप्नांचं काय ? या विषयावर ती आणि तिच्या 'अहों'नी एकत्र बसून सविस्तर चर्चा करायला हवी.‌ ती एकटी किती झिजणार ? हा फार गंभीर प्रश्न आहे. 

शतकानुशतके हा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर कुटुंबात, मित्र- मैत्रिणींमध्ये, समवयस्क स्त्रियांमध्ये, समाजमाध्यमात, समाजामध्ये चर्चा व्हायला हवी.‌ स्त्रीने खचून न जाता आपली ताकद ओळखावी. तिनं स्वतःची लढाई सुरू ठेवावी.‌ एका हाती उलथणं आणि दुस-या हातात लेखणी (माझ्या कामानुसार) घेऊन ती सगळ्या समाजाचा सामना करू शकते, सगळ्या जगाशी लढू शकते आणि ते जिंकूही शकते.