स्वाती आणि मनवा दोघीही ९ वी मध्ये होत्या. अडनिड्या वयात असं तासनंतासं ठराविक वेळी दररोज एकत्र येऊन गच्चीवर वेळ घालवणं, सतत कुजबुज करणं, वाढलेला नट्टापट्टा या बाबी स्वातीच्या आईच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. वयात येऊ घातलेल्या मुलीची आई म्हणजे किती दडपण नाही का?. "आता फार झालं. आज स्वातीच्या बाबांच्या कानावर हे घालायलाच हवं" असा दृढ निश्चय करून स्वातीच्या आईने आपला मोर्चा गच्चीकडे वळवलाच.
गच्चीवर कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच दचकून सावध झालेल्या स्वाती आणि मनवाने मूळ गप्पांच्या विषयाला बगल देत मुद्दाम गॅदरिंगचा विषय काढला. आईला कसं फसवलं या थाटात त्या दोघीही साळसूदपणाचं नाटक करू लागल्या. पण त्यांच्या चेह-यावरचे भाव काही वेगळंच सांगत होते. आईला वर आलेली पाहून स्वाती उठून उभी राहत म्हणाली, "अगं आई आम्ही खाली येतच होतो गं'. "आता काय ? उठावच लागणार" असं स्वत:शीच पुटपूटत मनवाने बसलेल्या कठड्यावरून उडी मारली. स्वाती पण स्वत:च्या घरात आली. स्वातीच्या आईचा चेहरा बघून तिने निमूटपणे अभ्यासाच्या पुस्तकात तोंड खुपसले. "आता काय, रात्री बाबा घरी आल्यावर आई बाबांचे कान भरणार. मग काय स्वाती, आता बाबांचा ओरडा खायला तयार रहा"! असं ती स्वत:शीच म्हणत आपल्या मनाची तयारी करू लागली.
क्रमश:
Copywrite : Vasudha Dhumak

दोघीही साळसूद चा आव आणून विषय बदलला.त्याच्या मानच हे वाचून दृश्य हुबेहूब डोळ्यासमोर राहते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद, तुमचं असंच प्रेम आणि आशिर्वाद सदैव असूदे !
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा